जरा आठवा तुमच्या मदतीला आलेला त्या हाताला, जरा आठवा तुमच्या यशापाठी असलेल्या त्या हाताला, जरा आठवा तुमच्या मार्गदर्शना साठी आलेल्या त्या हाताला , जरा आठवा तुमच्या कपाळावर चंदन करण्याऱ्या त्या हाताला, जरा आठवा तू यशस्वी भाव म्हणून आशीर्वाद देणाऱ्या त्या हाताला
काय माहित त्या हाताला बळ देणारे हेच हात असतील बहुतेक..
भारत माझा देश आहे सारे भारतीय माझे बंधू आहेत हे फक्त शाळेत बोलायचे म्हणून बोललो असे समजू नका आचरणात पण आणावे लागेल.
संत तुकाराम महाराजांच्या सुंदर वचना प्रमाणे गरजुंनना आपल्या कडून जे जे शक्य होईल ती ती मदत केली पाहिजे.
“एकहातमदतीचा“
ह्या ग्रुपचा निर्माण गरजू वृद्धाश्रम व अनाथ आश्रमांना मदतीचा हात देण्या हेतू करण्यात आला आहे.
हा ग्रुप दुवा आहे “दान देणाऱ्या हाताला गरजू हाता पर्यंत पोहोचवणारा.
खालीदिलेल्या लिंक वर क्लिक करून आपण या ग्रुप मध्ये शामिल होऊ शकता.
“आपण काय करतो”
“एक हात मदतीचा” हा ग्रुप गरजूंना मदत करण्याचा एक सोपा आणि सोयीस्कर मार्ग आहे. या ग्रुप मध्ये सामील होऊन आपण आपल्या दैनंदिन जीवनातून थोडासा वेळ काढून गरजूंना मदत करू शकतो.